मुंबई : लोकसभेपूर्वी कुठल्याही निवडणुका होतील असं वाटत नाही असं नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Loksabha Plan) यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. त्यानुसार आता मनसे नेते आणि पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावरती निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. मनसे नेते लोकसभा निहाय पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.
लोकसभा निहाय मनसेच्या कुठल्या नेत्याकडे कुठली जबाबदारी ?
मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे पुण्याची जबाबदारी
मनसे नेते बाबू वागस्कर यांच्याकडे शिरूर लोकसभेची जबाबदारी
मनसे सरचिटणीस वसंत मोरे यांच्याकडे बारामतीची जबाबदारी
मनसे सरचिटणीस अमेय खोपकर यांच्याकडे मावळची जबाबदारी
मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडे छत्रपती संभाजी नगरची जबाबदारी
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडे रायगड लोकसभेची जबाबदारी
मनसे सरचिटणीस किशोर शिंदे यांच्याकडे नाशिक लोकसभेची जबाबदारी
मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याकडे कल्याण लोकसभेची जबाबदारी
मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडे ठाणे पालघर भिवंडी ग्रामीणची जबाबदारी
मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्याकडे दक्षिण मुंबई लोकसभेची जबाबदारी.
मनसे नेते नितीन सरदेसाई,अमित ठाकरे, संदीप देशपांडे यांच्याकडे दक्षिण मध्य मुंबई जबाबदारी देण्यात आली आहे.
मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्याकडे उत्तर मुंबई जबाबदारी देण्यात आली आहे.
मनसे नेते शिरीष सावंत यांच्याकडे ईशान्य मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे.
मनसे सरचिटणीस योगेश परुळेकर,शालिनी ठाकरे, संदीप दळवी यांच्याकडे उत्तर पश्चिमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.