Nashik Accident

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात! धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटून हातात आला अन्…

5847 0

नाशिक : नाशिकच्या (Nashik Accident) नांदगाव भागात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (Nashik Accident) 20-25 विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना नांदगावपासून जवळ जामदरी – कळमदरी मार्गांवर घडली आहे. या भीषण अपघातात चालक, वाहक काही प्रवाशांसोबत सुमारे 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काय घडले नेमके?
हि बस चालवत असताना अचानक एसटी बसचा स्टेयरिंग रॉड तुटला. त्यामुळे बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. एसटीचा अपघात झाल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मिळेल त्या वाहनाने जखमीना रुग्णालयात आणले. काहींना डोक्याला तर काहींना पायाला मार लागला असून सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही.

या अपघाताची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेऊन विचापूस केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मात्र सुदैवानं कोणतीही मोठी जीवितहानी न झाल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!