Gondia Suicide

Gondia Suicide : स्वतःच्याच हाताने केला खेळखंडोबा; महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये भावी डॉक्टरचा दुर्दैवी अंत

708 0

गोंदिया : गोंदियामध्ये (Gondia Suicide) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली आहे. भूषण विलास वाढोणकर (23, रा. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. भूषण हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील इमारत क्रमांक सातमध्ये तिसऱ्या माळ्यावरील डी 31 क्रमांकाच्या खोलीत राहात होता. भूषण हा मागील काही दिवसांपासून नैराश्यात होता.

तो रविवारी सकाळी कामावर गेल्यानंतर सायंकाळी खोलीवर परतला. रात्री सहकाऱ्याने खोलीत जाऊन पाहिले असता भूषणने पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

भूषण रविवारी सकाळी आपली ड्युटी करून सायंकाळी रूमवर आला होता. रुममध्ये राहणारा त्याचा सहकारी हा रात्रीची ड्युटी असल्याने निघून गेला. दुसऱ्या दिवशी वेळ उलटून गेल्यावरही भूषण ड्युटीवर न आल्याने त्याच्या मित्राने दुसऱ्या मित्राला फोन करुन भूषणला ड्युटीवर यायला सांगण्यास असे सांगितले. त्याचा फोन बंद येत असल्याने त्याच्या मित्र मंडळींनी खोली गाठली. तेव्हा मित्राने दार जोरजोराने वाजवूनही उघडले नसल्याने सर्वांना संशय आला. यानंतर त्यांनी दार उघडले असता भूषण सीलिंग फॅनला दोराने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!