World Coconut Day 2023

World Coconut Day 2023 : आज आहे ‘जागतिक नारळ दिन’; जाणून घ्या इतिहास आणि महत्व

775 6

बहुपयोगी अशा नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ म्हटलं जातं. कारण नारळाच्या झाडापासून निर्माण होणाऱ्या सर्वच गोष्टी माणसासाठी फार उपयोगी आहेत. नारळाचे महत्त्व आणि आरोग्यविषयक फायद्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन (World Coconut Day 2022) म्हणून साजरा करण्यात येतो. चला तर मग जाणून घेऊयात जागतिक नारळ दिनाची सुरुवात कशी आणि कधी झाली ?

जागतिक नारळ दिनाचा इतिहास
जागतिक नारळ दिवस हा मुख्यतः आशियाई पॅसिफिक देशांमध्ये साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 2 सप्टेंबर 2009 रोजी साजरा करण्यात आला. APCC च्या स्थापनेसाठी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. ही एक आंतर-सरकारी संस्था आहे जी नारळाचे उत्पादन करणाऱ्या आशियाई-पॅसिफिक राज्यांवर देखरेख आणि सुविधा देते. तेव्हापासून दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो.

जागतिक नारळ दिनाचे महत्त्व
एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटीची स्थापना लक्षात ठेवणे हे जागतिक नारळ दिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दिवशी नारळाचे महत्त्व आणि फायदे सांगितले जातात. हा दिवस खास बनवण्यासाठी नारळ पाणी, खोबरेल तेल आणि दुधाला विशेष महत्त्व आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!