Sharad Pawar And Mamta

India Aaghadi : शरद पवारांनी ममता बॅनर्जींचा हात पकडत त्यांना खुर्ची केली ऑफर मात्र…

634 0

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून इंडिया आघाडीची (India Aaghadi) बैठक सुरु आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील दिग्गज नेते मुंबईत दाखल होत आहेत. या बैठकीला देशभरातील 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी हजर आहेत. यामध्ये 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्मंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) देखील या बैठकीला उपस्थित आहेत. सध्या या बैठकीमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नेत्यांसह बसण्यासाठी खूर्चीच उपलब्ध नसल्याने त्यांची शोधाशोध सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बैठकीमधून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खुर्चीच्या शोधात असताना शरद पवारांनी त्यांना आपली खुर्ची देवू केली होती. ममता बॅनर्जी यांचा हात पकडून पवारांनी त्यांना खुर्चीवर बसवण्यासाठी प्रयत्नही केला. परंतु ममता बॅनर्जी यांनी आपला हात सोडवत त्यांच्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला आणि दुसरीकडे खुर्चीच्या शोधात निघून गेल्या.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Share This News
error: Content is protected !!