मनोरंजन

South Actress Death: साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून (South Actress Death) नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साऊथ (South Actress Death) मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अपर्णा नायर यांचे निधन झाले आहे. या 31 वर्षीय अभिनेत्रीच्या निधनानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. अपर्णाच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही. तिच्या निधनाने सेलिब्रिटींसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ही घटना गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान घडली आहे. अभिनेत्रीच्या आई आणि बहिणीला याची माहिती मिळेपर्यंत त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मात्र, अपर्णा यांना निपचित पडलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी अभिनेत्री अपर्णा नायर यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

https://www.instagram.com/reel/Cv12OFNJ3oB/?utm_source=ig_embed&ig_rid=503f9a18-996f-4c9c-abb5-bdff9eee4c73

अपर्णा यांच्या पश्चात पती संजीत आणि दोन मुली श्रेया आणि कृतिका असा परिवार आहे. अभिनेत्री अपर्णा नायर इन्स्टाग्रामवरही खूप सक्रिय होत्या. मृत्यूच्या काही वेळ आधीच त्यांनी आपल्या मुलीचा एक व्हिडीओही पोस्ट केला होता. त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर अपर्णा नायर यांनी ‘चंदनमाझा’, ‘आत्मसखी’, ‘मैथिली वेंदुम वरुम’ आणि ‘देवस्पर्शम’ सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. याशिवाय त्या ‘मल्लू सिंग’, ‘थट्टाथिन मरायाथू’ आणि ‘जोशीज रन बेबी रन’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील झळकल्या होत्या.