Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad : गुवाहाटीचा खर्च मी केला; संजय गायकवाडांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

908 0

बुलढाणा : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आमदार आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. गुवाहाटीचा खर्च कोणी केला होता? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता. याला उत्तर देताना ‘गुवाहाटीचा खर्च मी केला होता’ असे प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिले आहे.

नेमकं काय म्हणाले होते आदित्य ठाकरे
गुवाहाटीला गेले त्याचा खर्च कोणी केला? असा सवाल विचारत आदित्य ठाकरे यांनी उदय सामंतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये विरोधकांच्या (Opposition Meeting) आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा उदय सामंतांकडून (Uday Samant) मांडण्यात आला आहे. या टिकेला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करु शकत नाहीत
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी इंडिया आघाडीवर देखील टीका केली. असे कितीही विरोधी पक्ष नेते एकत्र आले तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करु शकत नाही. हे मनाने हरलेले आणि शरीराने थकलेले किती दिवस टिकणार असी खोचक टीका संजय गायकवाड यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर केली आहे.

Share This News
error: Content is protected !!