Pune Accident

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

16340 0

दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरील (Pune Accident) उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या हद्दीत आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात (Pune Accident) झाला. या अपघातात 23 वर्षीय बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. एलाईट चौक परिसरात हा भीषण अपघात झाला. शुभम रमेश लेचरूड, (वय- 23, रा. डाळिंब ता. दौंड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

कसा घडला अपघात?
शुभम हा आपल्या दुचाकीवरून घरी डाळिंब या ठिकाणी निघाला होता. यावेळी भरधाव आलेल्या कंटेनर चालकाने शुभम चालवीत असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये शुभम याच्या डोक्याला जबर मार लागला आणि तो जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने उरुळी कांचन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रमेश गायकवाड व राजेश दराडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर अपघाताचा लोणी काळभोर पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. आपला तरुण मुलगा गमावल्याने शुभमच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News
error: Content is protected !!