Pune News

Pune News : हृदयद्रावक ! रक्षाबंधनादिवशी अपघात; बहिणीचा मृत्यू तर भाऊ जखमी

26947 0

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune News) बोरीभडक फाट्यावर चारचाकीने बहीण-भावाच्या दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात बहिणीचा मृत्यू झाला तर भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. वैशाली नितीन शेंडगे (वय- 28, रा. नायगाव, ता. पुरंदर) असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विलास विश्वनाथ कोपनर (रा. बोरीभडक, ता. दौंड) असे जखमी झालेल्या भावाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
वैशाली शेंडगे व विलास कोपनर हे बहीण-भाऊ आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त वैशाली शेंडगे या बंधू विलास यांच्याबरोबर दुचाकीवरून दौंड येथील बोरीभडक या ठिकाणी बुधवारी निघाल्या होत्या. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास बोरीभडक फाट्यावर सोलापूरच्या बाजूकडे जाणाऱ्या चारचाकी गाडीने पाठीमागून विलास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर वैशाली शेंडगे या रस्त्यावर पडल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर जखमा झाल्या.

यानंतर त्यांना तातडीने उपस्थित नागरिकांनी उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात भाऊ विलासला देखील दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच यवत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चारचाकी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली.

Share This News
error: Content is protected !!