Aurangabad News

Aurangabad News : धक्कादायक ! ‘ताई, मला माफ कर’ रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाने बहिणीच्याच घरात घेतला गळफास

2051 0

औरंगाबाद : देशभरात बुधवारी (30 ऑगस्ट) बहीण-भावाचा सण म्हणजेच रक्षाबंधन मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरे केले जात असताना औरंगाबादमध्ये (Aurangabad News) एक हृदयद्रावक घटना घडली. यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाने आपल्या बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.आकाश सर्जेराव शिंदे (वय 30 वर्षे, रा. खैरका, ता. मुखेड, जि नांदेड) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
आकाश एका कंपनीत काम करत होता. दरम्यान तो औरंगाबाद (Aurangabad News) येथे बहिणीच्याच घरी वास्तव्यास होता. तर, त्याची बहीण सुनंदा गोविंद गोंधळे याही एका कंपनीत कामाला आहेत. सुनंदा व त्यांचे पती गोविंद गोंधळे हे दोघे बुधवारी सकाळी नित्याप्रमाणे कामासाठी निघून गेले. रक्षाबंधन असल्याने मी आज घरीच थांबतो असे आकाशने बहिणीला सांगितले होते. तसेच कामावरुन आल्यानंतर रक्षाबंधन साजरा करण्याचे त्यांनी ठरवले होते.

यानंतर कामावर गेलेल्या सुनंदा दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घरी आल्या होत्या. बराच वेळ आवाज देऊनही आकाशने दरवाजा न उघडल्याने सुनंदा यांनी खिडकी उघडून घरात पाहिले असता, आकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. दरम्यान याची माहिती पोलिसांना देण्यात आली. याची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली. मात्र आकाशने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

आकाशने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने ‘ताई मला माफ कर, आईची काळजी घे’ असे लिहिले होते. आकाश मागच्या काही दिवसांपासून तणावात असल्याचे समजत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!