Viral Video

Viral Video : आता काय बोलावं ! 10 रुपयांच्या पाणीपुरीसाठी दोघांची रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी

593 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला पाणीपुरी खाण्याची आवड असेल तर तुम्हाला 10 रुपयांना मार्केटमध्ये (Viral Video) किती गोलगप्पे मिळतात हेदेखील माहिती असेल. सध्या सोशल मीडियावर (Viral Video) एक तरुण दहा रुपयांत सात गोलगप्पे खायला घालायचे, अशी मागणी करू लागला. यानंतर जे काही घडलं ते पाहून सगळेच थक्क झाले. एवढ्याशा कारणावरून दुकानदार आणि ग्राहक यांच्यात रस्त्याच्या मधोमध फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. ही घटना उत्तर प्रदेशातील हमीरपूर या ठिकाणी घडली आहे.

काय घडले नेमके?
रामसेवक नावाचा तरुण हमीरपूरमधील अकिल तिराहे येथे पाणीपुरी विकतो. तो पाच पाणीपुरी 10 रुपयांना विकतो. मात्र गावातील एका दबंग तरुणाने त्याला दहा रुपयात सात पाणीपुरी खायला घालण्यास सांगून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर जे काही घडलं ते तुम्ही व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की दोघं रस्त्यावर पडून एकमेकांना जोरदार मारहाण करताना दिसत आहे. रस्त्याने लोकांची ये-जा सुरू आहे, पण त्यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही. यादरम्यान दोघेही जणू कुस्तीचा सामना सुरू असल्यासारखे भांडत आहेत. सध्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide