Mumbai Pune Highway

Mumbai – Pune Express Way : मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक उद्या राहणार बंद

1200 0

पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरुन (Mumbai – Pune Express Way) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. उद्या मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एमएसआरडीसीकडून अपडेट देण्यात आली आहे. लोणावळा एक्झिट येथे काम असल्यानं उद्या दुपारी दोन तास रस्ता बंद राहणार आहे. जुलै महिन्यात पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर दरड कोसळल्यानं वाहतूक बंद ठेवावी लागली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील पुण्याकडे जाणारी मार्गिका दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती एएस आरडीसीकडून देण्यात आली आहे.

किती वेळ वाहतूक बंद असणार?
यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर (पुणे मार्गिका) लोणावळा एक्झिट (कि.मी क्र.54/225) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. हे काम उद्या म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. या कामासाठी दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील होण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide