Latur News

Latur News : जरा काम आहे जाऊन आलोच; पित्याने लेकरांना दिलेले ‘ते’ शब्द ठरले शेवटचे

645 0

लातूर : सध्या राज्यात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लातूरमध्ये (Latur News) अपघाताची अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात एका कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात नांदेडच्या मुकींद उत्तम जाधव (39) या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असणाऱ्या हिराबोरी तांडा येथील रहिवाशी असलेला 39 वर्षीय मुकींद उत्तम जाधव हा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात एम एच 26 बी एम 2558 या क्रमांकाच्या दुचाकीवरून आला होता. याच दुचाकीवरून तो रात्रीच्या वेळी आपल्या गावी जात असताना परचंडा पाटीजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एम एच 24 व्ही 6848 या क्रमांकाच्या कार चालकाने समोरून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात मुकींद उत्तम जाधव याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघताची माहिती मिळताच किनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी मुकींदचे वडील उत्तम जाधव यांच्या तक्रारीवरून किनगाव पोलीस ठाण्यात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदारे करत आहेत.या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. आपल्या मुलांना शिकवून खूप मोठं करायचं असे त्याचे स्वप्न होते मात्र आता मुकींदच्या जाण्याने पोरांवरच छत्र हरपलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!