Buldana News

Buldana News : एका शुल्लक कारणावरून बायकोसमोर नवऱ्याला गावगुंडांकडून बेदम मारहाण

4796 0

बुलढाणा : आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल पाहायला मिळतो. यामध्ये आपण विविध व्हिडिओ, फोटो काढत असतो. बुलढाण्यामध्ये (Buldana News) याच पायी एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये जिल्ह्यातील मलकापूर बस स्थानकात काही गावगुंडांनी एका प्रवाशाला बेदम मारहाण केली आहे.

काय घडले नेमके?
आपल्या छोट्या मुलीचा खेळताना व्हिडीओ काढत असलेल्या व्यक्तीला व्हिडिओ का काढत आहे…? असं विचारलं असता त्या ठिकाणच्या काही गावगुंडांनी त्यांना शिवीगाळ करत, महिलेच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण सुरु असताना महिला आडवायला आली असता तिलाही सदर गाव गुंडांनी लोटून दिल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या गुंडानी अत्यंत अमानुषपणे या व्यक्तीला मारहाण केली आहे. सध्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून या गावगुंडांना कसलाच धाक नसल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवरून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!