Virat-Kohli-Rohit-Sharma

ODI Asia Cup : ना रोहित ना विराट ‘या’ फलंदाजने आशिया कपमध्ये लगावले सर्वाधिक ‘षटकार

1046 0

आशिया चषक स्पर्धेला (ODI Asia Cup) सुरू होण्यास अवघे काही तास शिल्क आहेत. पहिला सामना आज ( 30 ऑगस्ट) रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत आशिया चषक स्पर्धेच्या वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांबद्दल….

आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज
1. शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi)
आशिया कपच्या (Asia Cup 2023) वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने 23 सामन्यात 26 षटकार ठोकले आहेत. यादरम्यान त्याने 2 शतके आणि एका अर्धशतकासह एकूण 532 धावा केल्या.

2. सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya)
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आहे, ज्याने 25 सामन्यांमध्ये 23 षटकार आणि 139 चौकार मारले आहेत. जयसूर्याने आशिया कपमध्ये एकूण 1220 धावा केल्या ज्यात 6 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

3. सुरेश रैना (Suresh Raina)
तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाचे नाव आहे. त्याने 13 सामन्यात 18 षटकार खेचले आहेत. या कालावधीत रैनाने 547 धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

4. रोहित शर्मा (Rohit Sharma)
भारताचा कर्णधार रोहित शर्माचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण 17 षटकार आणि 60 चौकार मारले आहेत. आशिया कपमध्ये 22 सामने खेळताना रोहितने एक शतक आणि पाच अर्धशतकांसह एकूण 745 धावा केल्या आहेत.

5. सौरव गांगुली (Sourav Ganguly)
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली पाचव्या क्रमांकावर आहे. गांगुलीने आशिया कपमध्ये एकूण 13 षटकार आणि 44 चौकार लगावले. या कालावधीत त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 518 धावा केल्या.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!