Rohit Pawar

Rohit Pawar : सरळसेवा भरतीसाठी One Time Registration पद्धत सुरु करा; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

643 0

मुंबई : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची ‘एक परीक्षा एक कट ऑफ’ ही एकच आग्रही मागणी आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. तसेच सरळसेवा भरतीसाठी राजस्थानच्या धर्तीवर one time registration पद्धत सुरु करावी. तसेच UPSC प्रमाणे सरसकट 100 रु परीक्षा शुल्क आकारण्याची विनंती रोहित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत हा विषय निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी रोहित पवारांना दिले.

काय म्हणाले रोहित पवार?
राज्यात सद्य स्थितीला वेगवेगळ्या विभागांच्या पदांसाठी सरळसेवा भरतीच्या परीक्षा सुरु आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना परिक्षांसाठी दूर अंतरावरील परीक्षा केंद्र मिळाले आहे. त्याचा मोठा खर्च विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळं सरळसेवा परीक्षासाठी विद्यार्थ्यांना मोफत एसटीचा प्रवास उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होईल असे रोहित पवार म्हणाले आहेत. तसेच राजस्थानच्या धर्तीवर one time registration पद्धत सुरु करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच UPSC प्रमाणे सरसकट 100 रुपये परीक्षा शुल्क आकारण्याची विनंती देखील रोहित पवारांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Share This News
error: Content is protected !!