Mumbai Mantralaya

Mumbai Mantralaya : अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं मंत्रालयात घुसून आंदोलन; संरक्षण जाळीवर आंदोलकांनी मारल्या उड्या

1031 0

मुंबई : मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन (Mumbai Mantralaya) सुरू आहे. मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मंत्रालयात घुसून अप्पर वर्धा धरणग्रस्त आंदोलनकांनी आंदोलन केलं आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आत्महत्या करू, असं म्हणत आंदोलनकांनी मंत्रालयातील दुसऱ्या माळ्यावरून सरंक्षक जाळ्यांवर उड्या मारल्या आहेत. हे सगळे आंदोलन करणारे शेतकरी हे अमरावतील जिल्ह्यातील आहेत.

या कारणामुळे सुरु आहे आंदोलन
अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा प्रश्न मागील 40 वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक दिवसांपासून धरणग्रस्तांचा आंदोलन सुरु होतं. मात्र सरकारने आंदोलनांची साधी दखलही न घेतल्याने आक्रमक झालेल्या आंदोलकांनी थेट मंत्रालय गाठलं आणि आंदोलन सुरु केलं. यानंतर पोलिसांनी कारवाई करून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Share This News
error: Content is protected !!