Viral Video

Viral Video : संतापजनक ! लेकानं जन्मदात्या आईला रस्त्यावरून नेलं फरपटत

1949 0

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बागपत या ठिकाणी (Viral Video) माणुसकीला काळिमा फासणारी घटना घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने जन्मदात्या आईवर अत्याचार केले आहेत. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही.

काय घडले नेमके?
हा संतापजनक व्हिडिओ बागपत जिल्ह्याच्या गुहर किशनपूर बराळ गावातील आहे. येथील वयोवृद्ध महिला आपल्या मुलाकडे विनवणी करत होती. मात्र, तिच्या मुलाने तिला पकडून रस्त्यावरून फरपटत नेलं. व्हिडीओमध्ये संबंधित महिला आपल्या मुलाकडे वारंवार विनवणी करताना दिसत आहे. परंतु त्याने आपल्या जन्मदात्या आईचं काहीही ऐकलं नाही. यावेळी काही गावकऱ्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कुणाचेच ऐकले नाही.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन यावेळी पोलिसांकडून देण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide