Pune News

Pune News : पुणे हळहळलं ! 8 व्या मजल्यावरून पडणाऱ्या मुलीला वाचवताना बापाचाही दुर्दैवी अंत

29528 0

पुणे : पुण्यातून (Pune News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Pune News) 8 व्या मजल्यावरुन पडून बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना देहू येथील इंद्रायणी वाटिका येथील एका सोसायटीत घडली आहे. रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
12 मजली इमारतीतील 8 व्या मजल्यावर हे कुटुंब राहत होते. रविवारी बाबा लेकीसोबत गॅलरीत होते तर त्यांची अडीच वर्षांची मुलगी कठड्यावर बसली होती. त्याचवेळी तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळत होती. लेकीचा जीव धोक्यात असतानाच वडिलांनी तिला वाचवण्यासाठी जीवाचे रान केले. कोणत्याही परिस्थितीत त्याला आपली मुलगी सुखरुप हवी होती. मात्र, नियतीलाच हे मान्य नव्हते मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलही खाली कोसळले. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मुलीची आई किचनमध्ये काम करत होती. लेकीचा तोल जाताच वडिलांनी तिला सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ते सुद्धा तिच्यासोबतच खाली कोसळले.

रमेश लागड असं मृत वडिलांचे नाव आहे तर तृषा लागड असे त्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचे नाव आहे. रमेश भारतीय लष्करात क्लर्क पदावर कार्यरत आहेत. मागील दीड वर्षांपासून ते इंद्रायणी वाटिका सोसायटीत राहतात. सोसायटीतील रहिवाशांना दुपारी 12.30 वाजता जोरदार आवाज आला. आवाज ऐकून बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिलं की रमेश लागड त्यांच्या मुलीसह खाली बेशुद्धावस्थेत पडले होते. रहिवाशांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र,त्या ठिकाणी डॉक्टरांनी दोघां बाप- लेकीला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!