Raigad News

Raigad News : 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा नदीत आढळला मृतदेह; प्रचंड खळबळ

5290 0

रायगड : रायगड (Raigad News) जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 14 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह सापडल्याने (Raigad News) मोठी खळबळ उडाली आहे. पनवेल तालुक्यात पेठ गावाजवळील नदीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. तन्मय आशिष मानकामे (वय 14 वर्ष) असे या अल्पवयीन मुलाचे नाव असून तो बेपत्ता मागच्या 2 दिवसांपासून बेपत्ता होता. तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी दिनांक 26 ऑगस्ट रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली होती.

तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार यांच्या पथकाने तन्मयचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी तन्मयचे कपडे पेठ गावाजवळील नदीच्या काठी सापडले. लागलीच यंत्रणेने पनवेल महानगर पालिका अग्निशामक दल, नवीन पनवेल अग्निशामक दलाला पाचारण केले.

यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने नदीत तन्मयचा शोध घेण्यात आला. त्यानंतर अखेर काल सकाळी तन्मयचा मृतदेह नदीमध्ये आढळून आला. तन्मयचा घात आहे अपघात आहे की आत्मघात याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तन्मयचा मृतदेह पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतला असून याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण वाघ करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!