जिओ युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून जिओ च्या एअर फायबरची आतुरतेनं वाट पाहत होते. आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी जिओ एअर फायबरबाबत (Jio Air Fiber) मोठी घोषणा केली आहे. जिओच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली आहे. गणेश चतुर्थी म्हणजेच, 19 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घर आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करणार आहे. जिओ एअर फायबरच्या लँडिंगमुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते.
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काय केल्या घोषणा ?
‘जिओ एअर फायबर’ गणेश चतुर्थीला लॉन्च होणार – मुकेश अंबानी
• 20 कोटी घरे आणि परिसरांपर्यंत पोहोचण्याची योजना
• दररोज 1.5 लाख कनेक्शन जोडता येतील
• आकाश अंबानीने ‘जिओ ट्रू 5G डेव्हलपर प्लॅटफॉर्म’ आणि ‘जिओ ट्रू 5G लॅब’ लॉन्च करण्याची घोषणा केली
• जिओची ऑप्टिकल फायबर पायाभूत सुविधा 15 लाख किलोमीटरमध्ये पसरलेली आहे
जिओच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली आहे, गणेश चतुर्थीला म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याची घोषणा केली. जिओ एअर फायबर 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घरे आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल. जिओ एअर फायबरच्या लॉंचिंग मुळे दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या महासभेत मुकेश अंबानी म्हणाले की, “आमच्या ऑप्टिकल फायबर सेवेशी, जिओ फायबरशी 10 दशलक्षाहून अधिक परिसर जोडलेले आहेत. तरीही लाखो कॅम्पस आहेत जेथे वायर कनेक्टिव्हिटी देणे कठीण आहे. जिओ एअर फायबर ही अडचण कमी करेल. याद्वारे आम्ही २० कोटी घरे आणि परिसरांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करत आहोत. जिओ एअर फायबर सादर केल्यामुळे, जिओ दररोज 1.5 लाख नवीन ग्राहक जोडू शकेल.
जिओचे ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण भारतात 15 लाख किमी पसरलेले आहे. सरासरी, ऑप्टिकल फायबरचा ग्राहक दरमहा 280 GB पेक्षा जास्त डेटा वापरतो, जो जिओच्या दरडोई मोबाईल डेटा वापराच्या 10 पट आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जिओ एअर फायबर तसेच जिओ ट्रू 5G डेव्हलपर प्लॅटफॉर्म आणि जिओ ट्रू 5G लॅब लॉन्च करण्याची घोषणा केली. लॉन्चची घोषणा करताना, जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले, “आम्ही एक व्यासपीठ तयार करत आहोत जे भारतीय उद्योग, छोटे व्यवसाय आणि तंत्रज्ञान स्टार्ट-अप्सच्या डिजिटल जगाशी संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणतील. एंटरप्राइझच्या गरजा लक्षात घेऊन, जिओ ने 5G नेटवर्क, एज कंप्युटिंग आणि अॅप्लिकेशन्स एकत्र करून एक सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. दुसरीकडे, ‘जिओ ट्रू 5G लॅब’ मधील आमचे तंत्रज्ञान भागीदार उद्योग-विशिष्ट समाधाने विकसित, चाचणी आणि सह-निर्मित करू शकतात. जिओ ट्रू 5G लॅब रिलायन्स कॉर्पोरेट पार्क, नवी मुंबई येथे असेल.