भंडारा : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. भंडारा जिल्ह्यात (Bhandara News ) अशीच एक अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये भरधाव ट्रकनं पती-पत्नीला धडक दिल्याने त्यांचा (Bhandara News ) जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. दुचाकीस्वार पती-पत्नी रस्त्याच्या कडेला वाहन लावून नातेवाईकांसोबत बोलत असताना हा अपघात झाला.
काय घडले नेमके?
बालचंद ठोंबरे (55), वनिता ठोंबरे (50), रा. वरठी असे या अपघातात (Bhandara News ) मृत पावलेल्या दाम्पत्याचे नाव आहे तर नलु दामोधर बडवाईक (40) रा. खरबी असं अपघातामध्ये जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुचाकीस्वार पती-पत्नी आपल्या एका नातेवाईकाशी बोलण्यासाठी रस्त्याच्या कडेला बाईक लावून बोलत थांबले होते. एवढ्यात विरुद्ध दिशेनं येणाऱ्या कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि यामध्ये पती -पत्नीचा जागीच मृत्यू झाला.