Pune News

Pune News : पुण्यात जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार

495 0

पुणे : आज पुण्यामध्ये (Pune News) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक पार पडणार आहे. या (Pune News) बैठकीमध्ये पुणे शहर ,पिंपरी चिंचवड शहर, आणि पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

बैठकीला पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये वाद्य परवाना, मंडप परवाना,वाहतूक कोंडी या सगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!