Jalna Crime News

Jalna Crime News : मारहाण होत असताना नातेवाईकांना लावला फोन मात्र नातेवाईक येईपर्यंत सगळंच संपलं

5361 0

जालना : जालन्यातील (Jalna Crime News) भिलपुरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalna Crime News) अज्ञात कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाला मारहाण होत असताना त्याने फोनवरुन नातेवाईकांना मदत मागितली. यानंतर नातेवाईकही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळं संपलं होत.

काय घडले नेमके?
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील दरेगाव शिवारात एका तरुणाची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. सिध्दार्थ मांदळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो भिलपुरी येथील रहिवासी होता. सिद्धार्थ हा मित्रांसोबत ड्रायपोर्टजवळील एका धाब्यावर जेवणासाठी गेला होता. त्याठिकाणी त्याला मारहाण करण्यात आली.

यादरम्यान सिद्धार्थने मारहाण होत असताना नातेवाईकाला फोनवरून मदत मागत होता. मारहाणीनंतर तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!