Crime News

Crime News : विकृतीचा कळस ! पुतणीने नको त्या अवस्थेमध्ये पाहिल्यावर काकीने दिली ‘ही’ शिक्षा

44068 0

अलिगढ : उत्तर प्रदेशमधील अलिगढ या ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना (Crime News) उघडकीस आली आहे. यामध्ये आपले अवैध प्रेमसंबंध लपवण्यासाठी काकीनेच पुतणीचा खून केला आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढ भागात घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी काकीच्या प्रियकरानेदेखील तिची मदत केली आहे.

आईने नकार दिलेला असतानाही काकी या चिमुकलीला जबरदस्तीने सोबत घेऊन गेली होती. मात्र थोड्यावेळाने एकटीच कपडे बदलून घरी आली. बराच वेळ झाला तरी मुलगी कुठेच दिसली नाही, मग घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. याबाबत पोलिसांत तक्रार दिली आणि पोलीस तपास सुरू झाला. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रकरणाचा छडा लावला आणि चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तर, काकी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. या दोघांनी चिमुकलीचा मृतदेह घराजवळच पेंड्यात पुरला होता.

चौकशी धक्कादायक माहिती आली समोर
काकीचे अवैध प्रेमसंबंध सुरू होते. तिला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत या चिमुकलीने पाहिलं होतं. तिने याबाबत घरातील इतर कोणाला सांगू नये यासाठी नराधम काकीने थेट तिच्या हत्येचा कट रचला. प्रियकराच्या साथीने तिला ठार मारून घराजवळच पेंड्यात पुरलं. या घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!