Feet

Health Tips : पायाला सूज येतेय..चुकूनही करू नका दुर्लक्ष होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

621 0

अनेकदा पायाला वारंवार सूज (Health Tips) येते. बहुतांशीजणांकडून आज-उद्या आराम वाटेल म्हणून अनेकजण आजाराकडे (Health Tips) दुर्लक्ष करतात. मात्र, पायाला अचानकपणे सूज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. पायाला सूज हे मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे हे महागात पडू शकते.

ही लक्षणे देतात किडनीच्या आजाराचे संकेत
सुजलेले पाय
जेव्हा पाय किंवा घोट्यावर सूज दिसून येते तेव्हा ते मूत्रपिंडाच्या आजाराचे लक्षण असू शकते. जेव्हा मूत्रपिंडात सोडियम पुरेसे प्रमाण नसते, तेव्हा ते योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम नसते. अशावेळी पाय सुजतात. म्हणूनच अशी लक्षणे दिसल्यावर वेळीच काळजी घ्या.

लघवीत फेस किंवा बुडबुडे तयार होणे
जर लघवीमध्ये फेस किंवा बुडबुडे तयार होत असतील तर याचा अर्थ मूत्रातून प्रथिने जात आहेत. हे मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण असू शकते. म्हणूनच अशी लक्षणे दिसल्यावर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.

वारंवार लघवी होणे
वारंवार लघवी होणे हे देखील किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते. मात्र, वारंवार लघवी होणे हे इतर रोगांचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डोळ्याभोवती सूज येणे
जेव्हा किडनी पोषक द्रव्ये नीट फिल्टर करू शकत नाही, तेव्हा लघवीतून मोठ्या प्रमाणात प्रथिने बाहेर पडू लागतात. त्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागात सूज येऊ लागते. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पायांना सूज आल्यास काय करावे
जेव्हा-जेव्हा पायांना सूज दिसली तेव्हा जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे, मूत्रपिंड सहजपणे शरीरातून सोडियम काढून टाकू शकतात आणि मॅग्नेशियम ऑब्जर्व करू शकतात. असे केल्याने किडनीचे कार्य सुरळीत राहते. अनेकदा पाणी कमी प्यायल्याने पायाला सूज येते. म्हणूनच पाणी पिणे आणि फळे आणि भाज्या खाणे आवश्यक आहे. त्यामुळे किडनीला व्यवस्थित काम करण्यास मदत होते.

Share This News
error: Content is protected !!