Nalasopara News

Nalasopara News : धक्कादायक ! प्रियकरासोबत झेंगाट जमलेल्या पत्नीने पतीची केली हत्या

13044 0

मुंबई : नालासोपारामध्ये (Nalasopara News) पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर महिलेने पतीचा अपघात झाल्याचा बनाव रचला होता. या हत्येप्रकरणी सहा जणांवर पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलीसांनी अटक केली आहे.

कळंब येथील समुद्र किनाऱ्यावर नालासोपारा पूर्वेकडे राहणारा रियाज अली (वय 55) हा त्याची पत्नी मन्सुरा (वय 35) आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांसोबत फिरण्यासाठी गेला होता. तिथे रियाज अली याचा ‘अपघात’ झाल्याचे सांगून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याने तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती.या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीसांनी रियाजची पत्नी मन्सुराची चौकशी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे.या प्रकरणी पत्नी मन्सुरा आणि तिचा प्रियकर गणेश पंडित यांना अटक करण्यात आली असून आणखी सहा जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
नालासोपारा येथील गणेश पंडीत याच्या किराणा मालाच्या दुकानात रियाजची पत्नी मन्सुरा काम करत असून तेथे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. पती रियाज हा या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने त्याची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. त्यानुसार पत्नी मन्सूरा 21 ऑगस्ट रोजी पती रियाज याला फिरण्याच्या बहाण्याने कळंब समुद्रकिनार्‍यावर घेऊन गेली. तेथे तिच्या प्रियकर व अन्य साथीदारांच्या मदतीने पती रियाजची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!