Dev Kohli

Dev Kohli Passed Away : गीतकार देव कोहली यांचे निधन

720 0

ज्येष्ठ गीतकार देव कोहली (Dev Kohli) यांचे निधन झाले आहे. आज सकाळी वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.अखेर आज त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. देव कोहली यांचे आज पहाटे चार वाजता झोपेतच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

देव कोहली यांनी ‘लाल पत्थर’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘बाजीगर’, ‘जुडवा 2’, ‘मुसाफिर’, ‘इश्क’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’, ‘टॅक्सी नंबर 911’ सारख्या शेकडो सुपरहिट सिनेमांची गाणी लिहिली आहेत. देव कोहली यांनी सलमान खानच्या (Salman Khan) ‘मैंने प्यार किया’ या ब्लॉकब्सटर सिनेमातील ‘कबूतर जा जा’, ‘आज शाम होने आयी’, ‘आते जाते हाथते’, ‘काहे तोसे सजना’ यांसारखी सुपरहिट गाणी लिहिली आहेत.

देव कोहली यांनी ‘लाल पत्थर’ सिनेमातील ‘गाता हूं मैं’; ‘हम आपके हैं कौन’मधील माई ना माई मुंडेर पर तेरी बोल रहा है कागा, ‘बाजीगर’ सिनेमातील ‘काली आंखें’, ‘जुडवा 2’ सिनेमातील ‘चलती है क्या नौ से बारह’, ‘मुसाफिर’मधील ‘ओ साकी साकी’ अशी अनेक सुपरहिट गाणी त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत राम लक्ष्मणपासून अन्नू मलिक, आनंद मिलिंद, आनंद राज आनंदपर्यंत अनेक बड्या संगीतकारांसोबत काम केले होते.

Share This News
error: Content is protected !!