Pandharpur Accident

Pandharpur Accident : पंढरपुरात पालखी महामार्गावर कारचा भीषण अपघात; एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं

26272 0

पंढरपूर : राज्यात अपघाताचे (Pandharpur Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यात दररोज अपघाताच्या (Pandharpur Accident) अनेक घटना समोर येत असतात. यातील काही घटना या कारचालकाच्या चुकीमुळे होत असतात. अशीच एक घटना पंढरपूर तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर घडली आहे.

पेनूर – तुंगत मार्गावर इर्टीका गाडी रस्ता दुभाजकला धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत गाडीचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने एअर बॅग उघडल्याने वाहन चालक व प्रवासी बचावले आहेत. या गाडीमध्ये 3 जण होते. ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात नेमका कशामुळं झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide