Accident News

Accident News: बहिणीकडून परतत असताना काळाचा घाला; रक्षाबंधन अगोदर भावाचा दुर्दैवी मृत्यू

5877 0

वाशीम : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यात दररोज अपघाताच्या (Accident News) अनेक घटना समोर येत असतात. यातील काही घटनांमध्ये लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. अशीच एक अपघाताची घटना वाशिममध्ये घडली आहे. यामध्ये ट्रकच्या धडकेत बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड – मालेगाव महामार्गावरील दापुरी गावाजवळ हा अपघात झाला.

काय घडले नेमके?
मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचं नाव अरुण श्रीराम लामणे असं आहे. ते आपल्या बहिणीच्या शेतातील पिकांवर किटनाशकाची फवारणी करून आपल्या गावी परतत असताना हा भीषण अपघात झाला. घरी पोहोचण्याच्या केवळ 3 किलोमीटर अगोदरच ढाब्याजवळ त्यांच्या बाईकची समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली आणि हा अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता कि अरुण यांचा जागीच मृत्यू झाला.

अवघ्या काही मिनिटांमध्ये अरुण लामणे आपल्या वाघी गावातील घरी पोहोचणार होते. मात्र काळाने त्यांच्यावर रस्त्यातच घाला घातला.अरुण लामणे यांचा मृतदेह रिसोडच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. या अपघातामुळे अरुण यांच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. रक्षाबंधना अगोदर बहिणीने आपला भाऊ गमावल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. शिरपूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!