Health Tips

Health Tips : चुकूनही ‘ही’ पाच फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका; नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ परिणाम

760 0

फळे खाण्याचे शरिराला असंख्य फायदे (Health Tips) आहेत. फळांत व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर, कॅल्शियम आयरन सारखे पोषक तत्वे असतात. हे सर्व पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी गरजेचे (Health Tips) असतात. फळांचे वेगवेगळे प्रकार असतात आणि प्रत्येक फळांचे वेगळे फायदे असतात. मात्र, फळं कधी व किती प्रमाणात खावे याचे काही नियम असतात. त्याचबरोबर कोणते फळ कशासोबत खावे, हे देखील आयुर्वेदात सांगण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या मते अशी काही फळे आहेत जी खाल्ल्यानंतर तुमच्या लगेचच पाणी प्यायल्यामुळं गंभीर परिणाम भोगावे लागू शकता. कारण या तुमच्या चुकीच्या सवयीमुळं पोटासंबंधी व पचनासंबंधी तक्रारी निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया कोणती फळे खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिणे चुकीचे आहे.

डाळिंबं
डाळिंबं हे लहान मुलांपासून मोठेदेखील आवडीने खातात. डाळिंब्यामुळं शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. मात्र, हे फळ खाल्ल्याने लगेचच पाणी पिण्याची चूक करु नका. असं केल्यास अ‍ॅसिडिटी, मळमळ किंवा उलटी होण्याची शक्यता असते.

केळे
केळे हे उर्जेचे स्त्रोत आहे. यात मोठ्या मात्रेत पॉटेशियम आढळले जाते. बद्धकोष्ठता आणि पोटाच्या विकारांसाठी केळे बहुगुणी मानले जाते. मात्र त्याच्यावर पाणी प्यायल्याने तुमचं पाचनतंत्र पूर्णपणे बिघडू शकते.

आबंट फळे
आबंट फळे म्हणजे संत्रे, द्राक्षे, मोसंबी, आवळा अशी फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका. कारण ही फळे खाल्ल्यानंतर शरीराची पीएच लेव्हल बिघडू शकते आणि पाचनसंस्था पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाते.

टरबूज व कलिंगड
कलिंगड व टरबूज हे पाण्याने युक्त असलेले फळ आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, टरबूज खाल्ल्यानंतर कधीच पाणी पिऊ नये. त्यामुळं पाचनसंस्था बिघडू शकते आणि जुलाब होण्याची शक्यता असते.

पेरू
पेरुमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीच्या गुणांसह फॉलिक अ‍ॅसिड, पोटॅशियम, कॉपर यांचा उत्तम स्त्रोत आहे. पेरु खाल्ल्याने पाचनतंत्र सुधारते. मात्र तुम्ही त्यावर पेरू खाल्ल्यास तुमची पाचनसंस्था बिघडू शकते. त्यामुळं कधीच या पाच फळांवर पाणी पिणे धोकादायक ठरु शकते.

Share This News
error: Content is protected !!