Buldhana News

Buldhana News : दुचाकी चालवताना हार्ट अटॅक आल्याने भाजपच्या ‘या’ नेत्याचा मृत्यू

626 0

बुलढाणा: भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा (Buldhana News) जिल्हा उपाध्यक्ष जानराव देशमुख यांचे हार्ट अटॅकने निधन झालं आहे. ते 56 वर्षांचे होते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावकडे काही कामानिमित्त दुचाकी ने जात असताना वानखेडे या ठिकाणी त्यांना अचानक हार्ट अटॅक आला. यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
गुरुवारी (24 ऑगस्ट) दुपारी ते दुचाकीने वानखेडे येथून खामगावला जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यात पातुडा फाट्याजवळ एक ठिकाणी ते थांबले. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तींनी त्यांना वरवट बकालीतील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जानराव देशमुख यांनी संग्रामपूर पंचायत समितीचे सभापती पदही भूषवले होते. एकंदरीत अचानक घडलेल्या या घटनांमुळे परिसरात हळ हळ व्यक्त केला जात आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.

Share This News
error: Content is protected !!