Nashik News

Nashik news : नाशिक हादरलं ! भरदिवसा भाजीविक्रेत्याची हत्या

25785 0

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik news) गेल्या काही दिवसांपासून हत्येचे सत्र सुरूच आहे. आज (Nashik news) पुन्हा एकदा अंबड परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. पोलीस चौकीच्या काही अंतरावरच भाजीविक्रेत्याची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसात नाशिकमध्ये खुनाची ही चौथी घटना आहे. यामुळे संपूर्ण नाशिक हादरलं आहे.काही दिवसांपूर्वी शहरातील अंबड भागात एका सराईत गुन्हेगाराला टोळीवादातून संपविण्यात आल्याची घटना घडली होती. अशातच याच परिसरात भरदिवसा नागरिकांच्या गर्दीत एका भाजीविक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
ही खुनाची घटना गुरुवारी भरदिवसा दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. अंबड परिसरातील सिडको येथे शॉपिंग सेंटर जवळ शस्त्रधारी हल्लेखोरांनी भाजी विक्रेत्या तरुणावर सपासप वार करून ठार केले. संदीप आठवले (Sandeep Athwale) असे हत्या करण्यात आलेल्या भाजीविक्रेत्याचे नाव आहे. चार ते सहा हल्लेखोरांनी भाजी विक्रेता संदीप याच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याच्या पथकासह गुन्हे शाखा, इंदिरानगर, एमआयडीसी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आठवले याचा मृतदेह रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत हल्लेखोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची दोन पथके तसेच अंबड गुन्हे शोध पथक रवाना करण्यात आले आहे. हल्लेखोरांना अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला होता. मात्र पोलिसांनी काही तासातच संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

याप्रकरणी मुख्य आरोपी ओम प्रकाश पवार उर्फ मोठा ओम्या खटकी याच्यासह ओम चौधरी उर्फ छोटा खटकी, साईनाथ गणेश मोरताटे उर्फ मॅग्गी मो-या, अनिल प्रजापती व पार्थ साठे यांना ताब्यात घेतले आहे. तर तीन आरोपींचा शोध सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!