Prajakta Mali

Prajakta Mali : प्राजक्ता माळी झळकणार ‘या’ चित्रपटात; पोस्ट शेअर करत म्हणाली “दुनिया गेली तेल लावत…”

1458 0

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात (Prajakta Mali) एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. आता लवकरच प्राजक्ताचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत आपल्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितले.

‘तीन अडकून सीताराम’ असं प्राजक्ताच्या अगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात प्राजक्ताबरोबर वैभव तत्तवादी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील दोघांचे लूक समोर आले आहेत. 29 सप्टेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिलं आहे “कोणाला नाही ऐकत, कोणाला नाही जुमानत.. दुनिया गेली तेल लावत ….असं म्हणत 29 सप्टेंबरपासून धुमाकूळ घालायला येत आहेत, ‘तीन अडकून सीताराम’ !”

प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपट, नाटक, वेबसिरीजच्या माध्यमातून प्राजक्ताने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मराठी विनोदी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!