Jalgaon Accident

Jalgaon Accident : ओव्हरटेकच्या नादात रिक्षाचा अपघात; 1 ठार तर 7 जखमी

5756 0

जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalgaon Accident) ओव्हरटेकच्या नादात ओमनी गाडीने रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षा पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. दादाराव किसन सुरवाडे असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बोदवड ते जामनेर रोडवर शेलवड वाकी फाट्याजवळ हा अपघात झाला. रिक्षाला धडक दिल्यानंतर ओमनी कारचा चालक घटनास्थवरून पळून गेला आहे. या अपघातात 7 जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जीवन कडु सुरवाडे यांच्या फिर्यादीवरुन बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावरिोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
जामनेर रोडवर शेलकी वाकी फाट्याजवळ जामनेरकडे भरधाव वेगात ओमनी गाडी चालली होती. तर अपघातग्रस्त रिक्षा विरुद्ध दिशेने येत होती. आरोपी चालक त्याच्या पुढे चाललेल्या दुसऱ्या ओमनीला ओव्हरटेक करत होता. यावेळी ओव्हरटेकच्या नादात तो रस्त्याच्या चुकीच्या दिशेने जात असताना समोरुन येणाऱ्या अ‍ॅपे रिक्षाला धडकला. रिक्षाला धडकल्याने रिक्षाचालक प्रदीप राठोड यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्याच्या बाजूला पलटी झाली.

ओमनी चालकाचा शोध सुरु
रिक्षा पलटल्याने रिक्षातील दादाराव सुरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील इतर सात प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ओमनी चालकाने घटनास्थवरून पळ काढला. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!