Kolhapur Crime

Kolhapur Crime : माझा तिने फक्त वापर केला… म्हणत एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या

10479 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Kolhapur Crime) एकतर्फी प्रेमातून अपयश आल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. विठ्ठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. चंदगड पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

“त्या मुलीने माझा केवळ वापर केला”
मृत विठ्ठलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्या मुलीने माझा केवळ वापर केला. निर्भया पथकाची भीती दाखवून त्यांनी माझ्याकडून तिला परत मेसेज न करण्याचे जबरदस्तीने लिहून घेतले आहे. तिला मी विसरू शकत नसल्याने शेवटचा हा पर्याय निवडला. आय एम सॉरी असे लिहिले आहे.

विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून समुपदेशन केले होते. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे विठ्ठलच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. चंदगड पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!