Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना जपानकडून मानद डॉक्टरेट पदवी जाहीर

1006 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट (Devendra Fadnavis) जाहीर केली आहे. त्याबाबतची घोषणा विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मानद डॉक्टरेट जाहीर झाली आहे.

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य, तसेच महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून ही मानद डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली आहे. कोयासन विद्यापीठाचे डीन श्री.सोईडा सान यांनी ही घोषणा केली.

Share This News
error: Content is protected !!