Viral Video

Viral Video : पापाच्या परीने गाठली थेट दरी; Video व्हायरल

770 0

पावसाळ्याची सुरुवात होताच सगळ्याना फिरण्याचा मोह आवरत (Viral Video) नाही त्यात जर रस्तावरुन जातांना एखादी दरी दिसली तर फोटो काढला माणूस मागे पुढे बघत नाही. अलीकडे तर रील्सचं वेड ही इतकं वाढलंय की या वेड्या प्रेमात वेडी झालेली लोकं भररस्त्यात डान्स करण्यासाठी सुद्धा गाडी थांबवून ट्रॅफिक अडवायला मागे पुढे पाहात नाहीत. पण अशा एखाद्या वळणाच्या रस्त्यावर गाडी कडेला उभं करणं म्हणजे स्वतःच्या जीवाशी सुद्धा खेळ करण्यासारखं आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहाच.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तीन तरुणीना रस्त्याच्या कडेला थांबणं फारच महागात पडले. अश्या अवघड रस्त्याचा कडेला थांबण्याचा उद्देश काय होता हे माहिती नाही. तुम्ही विडिओ मध्ये बघू शकता की हा चढणीचा रस्ता वाटत आहे. त्यामुळे मुळातच इथे गाडी थांबवणे म्हणजे कॉमन सेन्सचा अभाव म्हणता येईल. त्यात या तरुणी ट्रिपल सीट जात होत्या.

गाडी थांबवताना त्यांच्यातील विश्वासू ड्रायव्हरचं संतुलन गेलं आणि मग जे झालं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा विडिओ कुठला आहे हे मात्र कळू शकले नाही पण या मुली रस्त्यावरून कोसळून दरीत झाडाच्या झुडपात पडून राहिल्या अशाप्रकारे जीवाशी खेळ करणारे प्रकार आपणही टाळायलाच हवेत. हा विडिओ सध्या सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होत असून अनेकानी त्या तरुणींवर टीका केली आहे.

Share This News
error: Content is protected !!