Jalgaon News

Jalgaon News : जळगाव झालं सुन्न ! श्रावण सोमवारनिमित्त मंदिरात गेलेल्या एकाच कुटुंबातील 3 तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

4846 0

जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या (Jalgaon News) गिरणा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त कावड घेवून दर्शनासाठी गेलेल्या 3 तरुण भाविकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गिरणा तापी नदीच्या संगमावर काल दुपारी3.30 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. सागर शिंपी, अक्षय शिंपी आणि पियुष शिंपी तिन्ही रा. एरंडोल अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. हे तिघेजण एकाच कुटुंबातील आहेत.

काय घडले नेमके?
काल श्रावण सोमवार असलयाने हे तिघेजण जळगावातील प्रसिद्ध असलेल्या रामेश्वर या तीर्थक्षेत्रावर जात असलेल्या कावड यात्रेत सहभागी झाले होते. या ठिकाणी ते संगमावर गेल्यानंतर नेमके कसे बुडाले याची माहिती अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व NDRF ची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

यानंतर त्यांनी या तिन्ही तरुणांचा तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली. तीनही तरुण हे एरंडोल शहरातील रहिवासी असून एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.बुडालेल्या तीनही मुलांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफची टीम रवाना करण्यात आली असून मुलांचा शोध सुरू आहे. या तिघांपैकी दोघांचा मुलाचा शोध लागला असून एकाचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही.

Share This News
error: Content is protected !!