Beed News

Beed News : धक्कादायक ! बीडमध्ये बेडरूमला लागलेल्या आगीत 19 वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू

4110 0

बीड : बीडमध्ये (Beed News) एक दुर्दैवी घेताना घडली आहे. यामध्ये (Beed News) शॉर्टसर्किटमुळे घरातील एका बेडरुमला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये एका 19 वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास बीडमधील भक्ती कन्स्ट्रक्शन परिसरामध्ये घडली आहे. घरातील काचा फुटण्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.

काय घडले नेमके?
बीड शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन सर्कस ग्राऊण्ड परिसरात विकास डावकर कुटुंबासह राहतात. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये त्यांचा मुलगा प्रसाद डावकर (वय वर्ष 19) हा झोपलेला होता. घराच्या पीओपीला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. यात प्रसाद डावकरचा होरपळून मृत्यू झाला.शॉर्टसर्किटचे आगीत रुपांतर झालं. सर्व रुमच्या खिडक्या बंद होत्या. अशातच धूर आणि आगीमुळे घराच्या खिडक्यांच्या काचा स्फोटाप्रमाणे फुटल्या आणि याचा आवाज सर्वदूर गेला. आवाजानेच परिसरातील आजूबाजूचे लोक हादरले आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घरातील लोकांनाही हा आवाज आला, मात्र नेमकं घडलं काय, हे मात्र माहीत नव्हतं. मात्र शेजारील लोकांनी तुमच्या वरच्या मजल्यावर काहीतरी घडले आहे, असं म्हणत घरच्यांना दुसऱ्या मजल्यावर नेलं. रूमचा दरवाजा तोडल्यानंतर पाहिले तर त्यांचा १९ वर्षीय मुलगा आगीमध्ये होरपळून मृत पावला होता. या घटनेची माहिती नागरिकांनी अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाला दिली. यानंतर अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी प्रसाद डावकरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे डावकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Share This News
error: Content is protected !!