Solapur News

Solapur News : पती – पत्नींमधील सततच्या वादाला कंटाळून विवाहितेने उचलले ‘हे’ पाऊल; लेकरं झाली पोरकी

7171 0

सोलापूर : पती – पत्नी म्हंटल कि किरकोळ कारणावरून सतत वाद होत असतात. प्रत्येक घरात अशी किरकोळ भांडण होत असतात. मात्र सोलापुरातील (Solapur News) मोहोळ तालुक्यात याच किरकोळ भांडणावरून संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. यामध्ये (Solapur News) पती – पत्नीमध्ये झालेल्या वादातून पत्नीने रागाच्या भरात थेट गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुका हादरला आहे. रागाच्या भरात विवाहितेने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

काय घडले नेमके?
अमिना जहांगीर कोरबू (40, रा. क्रांती नगर ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. तिने पती सोबत झालेल्या किरकोळ भांडणातून स्वतःच आयुष्य संपवलं आहे. 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अमिना कोरबू या विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला. अमिना कोरबूच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी जहांगीर कोरबू (43,रा क्रांती नगर,ता.मोहोळ) यांच्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

जहांगीर कोरबू यांचा मोहोळ तालुक्यातील क्रांती नगर येथे इमिटेशन ज्वेलरीचा छोटासा व्यवसाय आहे. अमिना कोरबू आणि जहांगीर कोरबू हे दोघे जण या व्यवसायातूंन कुटुंबाची उपजीविका चालवत होते. या दाम्पत्याला मुजमिल आणि मेहेरबानो अशी दोन मुले आहेत. व्यवसायात तेजी मंदी असते. यावरून कधी कधी दोघांत खटके उडत होते. दोन दिवसांपासून अमिना आणि जहांगीर या दोघांत कुरबुर सुरू होती. 18 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अमिना आणि जहांगीर या दोघां पतीपत्नीत कडाक्याचे भांडण झाले होते. दोघेही रागाच्या भरात होते. पती जहांगीर हा पाणी पिण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला. अमिना कोरबू या विवाहितेने रागाच्या भरात दुसऱ्या खोलीत जाऊन दार लावून घेतले.

यानंतर पती जहांगीर हा पळत आला आणि खोलीचा दार उघड अमिना असे सांगू लागला. पतीने खिडकीतून डोकावून पाहिले असता पत्नी अमिना ही नायलॉनच्या दोरीने गळफास घेत असल्याचे आढळून आले. यानंतर पती जहांगीरने आरडाओरडा करत शेजाऱ्याना बोलावून घेतले आणि दार तोडून आतमध्ये प्रवेश केला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने अमिनाला खाली उतरवून मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटेनमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!