Pankaj Tripathi Father

Pankaj Tripathi : बॉलीवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांना पितृशोक

772 0

‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांना पितृशोक झाला आहे. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचे वडील पंडित बनारस तिवारी यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी बिहारच्या बेलसंड गावामध्ये आपला अखेरचा श्वास घेतला. कुटुंबातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, पंकज त्रिपाठी यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे आज सकाळी त्यांची अचानक तब्येत खालावली आणि त्यांचे निधन झाले.

पंकज त्रिपाठी हे बिहारच्या गोपालगंज या ठिकाणी राहत होते. तर करिअर करण्यासाठी पंकज हे मुंबईत आले होते. तर त्यांचे वडील आणि आई दोघेही त्यांच्या गावी राहत होते. पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं होतं की त्यांचे वडील फक्त एकदा मुंबईला आले होते. त्यांना मुंबईतली मोठी मोठी घरं आणि बिल्डिंग आवडत नाही. तर त्यांच्या वडिलांनी कधीच थिएटरमध्ये जाऊन कोणता चित्रपट पाहिलेला नाही. घरी देखील ते त्यांचा मुलगा पंकज त्रिपाठीचे चित्रपट देखील तेव्हाच पाहायचे जेव्हा कोणी टिव्ही किंवा कॉम्प्युटरवर त्यांना कोणी ते दाखवत असे. काही दिवसांपूर्वीच पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या गावच्या घरी आई-वडिलांसाठी एक टिव्ही आणला होता.

Share This News
error: Content is protected !!