Court Bail

Pune News : फुरसुंगी, उरुळी देवाची पालिकेच्या हद्दीतून बाहेर नाहीत; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

371 0

पुणे : पुण्यातील (Pune News) फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे पुणे महापालिकेतून (Pune News) वगळण्यात आलेली नाहीत. यासंदर्भात अद्याप अंतिम अधिसूचना काढण्यात आलेली नाही, अशी माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयाला दिली. अंतिम अधिसूचना कायद्याच्या चौकटीतच घेतली जाईल, अशी हमीदेखील राज्य सरकारने यावेळी उच्च न्यायालयाला दिली.

फुरसुंगी व उरुळी देवाची, ही दोन गावे पुणे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याच्या राज्य सरकारच्या मार्च 2023 च्या निर्णयाला रणजीत रासकर व अन्य काही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे होती. महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपुष्टात आल्याने पालिकेवर आयुक्तांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि गावे वगळण्याचा निर्णय त्यांच्याशी सल्लामसलत करून घेण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!