पावसाचे दिवस सुरु होतात त्यावेळी प्रत्येकाचेच पाय पावसाळी सहलींच्या ठिकाणांकडे (Viral Video) वळतात.देशाच्या विविध भागांमध्ये पावसादरम्यानच हे असंच चित्र असतं. ओथंबून वाहणारे जलप्रवाह आणि कडेकपारीतून खळाळत (Viral Video) झाली येणारा आणि आपल्याला चिंब भिजवणारा धबधबा प्रत्येक वेळी हवाहवासा वाटतो. पण, या धबधब्याखाली भिजणं कितपत सुरक्षित आहे याचा विचार तुम्ही कधी केलाय का? कधी कधी धबधब्याखाली मौजमजा करणे तुमच्या जीवावर बेतू शकते. सध्या याचा प्रत्यय देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
बरसात के मौसम के दौरान पहाड़ो में झरनों के नीचे नहाने से बचें। pic.twitter.com/bY9Xs08zxw
— Chamoli Police Uttarakhand (@chamolipolice) August 20, 2023
काय घडले नेमके?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता काही पर्यटक धबधब्याखाली आंघोळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यावेळी तिथं एक ढिगारा अचानक त्यांच्या अंगावर येऊन पडतो आणि ते सगळे या ढिगाऱ्याखाली दबले जातात. उत्तराखंड राज्यातील चमोली पोलिसांनी हा व्हिडीओ पोस्ट करत सगळ्यांना खबरदारीचे आवाहन केले आहे.हे सगळे अचानक घडल्याने लोकांनाही काही समजले नाही. या दरम्यान काही लोक धबधब्याच्या पलीकडे जाण्यात यशस्वी होतात, तर बहुतेक पाण्यात अडकून राहतात. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हा व्हिडीओ @@chamolipolice या पोलिसांच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. याशिवाय शेकडो युजर्सनी यावर कमेंट केल्या आहेत. ही दुर्दैवी घटना उत्तराखंडमधील असल्याचे समजत आहे.