Vijaykumar Gavit

Vijaykumar Gavit : ‘पोरगी पटवायची असेल तर..’; भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

680 0

धुळे : भाजप नेते आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत (Vijaykumar Gavit) हे सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. दररोज मासे खा, मासे खाल्ल्यामुळे तुमचे डोळे सुंदर होतील. मग तुम्हाला ज्या मुलीला पटवायचे आहे, ती मुलगी तुम्हाला पटेल असं वक्तव्य गावित यांनी (Vijaykumar Gavit) एका कार्यक्रमादरम्यान केले. ते धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छिमार बांधवांना मासेमारीच्या साहित्याचं वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

काय म्हणाले विजयकुमार गावीत ?
विजयकुमार गावीत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. ‘दररोज मासे खात जा. मासे खाल्ल्यामुळे तुमचे डोळे सुंदर होतील. मग तुम्हाला ज्या मुलीला पटवायचं आहे, ती मुलगी तुम्हाला पटेल असं गावीत भरसभेत म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले दररोज मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर आहेत. ऐश्वर्या राय ही बंगळुरूजवळील समुद्र किनारी असलेल्या शहरात राहायची. ती दररोज मासे खात होती. त्यामुळे तिचे डोळे एवढे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल्ले तर तुमचे डोळे ऐश्वर्या रायप्रमाणे सुंदर होतील. त्वचा देखील सुधारेल’. असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

या वक्तव्यामुळे विजयकुमार गावीत चांगलेच चर्चेत आले आहेत. धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छिमार बांधवांना मासेमारीच्या साहित्याचं वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार हिना गावित यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!