आपला महाराष्ट्रक्राईमठळक बातम्या

Mumbai News: मुंबईतील महिलेने श्वानासोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य; CCTV फुटेज पाहून बसेल धक्का

मुंबई : श्वानाची गणना जगातील सर्वात प्रामाणिक प्राण्यांमध्ये केली जाते. त्याने एकदा आपल्या मालकाला जीव लावला कि तो मरेपर्यंत त्याची साथ सोडत नाही. आपल्या मालकाचा जीव वाचवण्याची वेळ आली तर ते स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. मात्र, काहीवेळा माणूस विनाकारण कुत्र्यांसोबत असं काहीतरी कृत्य करतो, जे हादरवून टाकणारं असतं.मुंबईतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

काय घडले नेमके?
या घटनेत एका महिलेने एका श्वानावर चक्क अ‍ॅसिड फेकलं. ही घटना मुंबईतील मालवणी परिसरामध्ये घडली आहे. मालवणीतील एका सोसायटीच्या आवारात एक पाळीव श्वान बसलेलं होतं. याच पाळीव कुत्र्यावर महिलेने हे अ‍ॅसिड फेकलं. पाळीव कुत्र्यावर महिलेनं केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

जेव्हा ही महिला सोसायटीच्या आवारात बसलेल्या श्वानावर अ‍ॅसिड फेकते. यानंतर श्वान वेदनेनं विव्हळत इकडे तिकडे पळू लागतो. यानंतर तो सोसायटीच्या गेटमधून बाहेर जातो. याबाबत तक्रार मिळताच मुंबई पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या महिलेच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.