Sujit Patkar

Sujit Patkar : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक

521 0

मुंबई : कोविड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांना आता अटक केली आहे. जंबो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणी (Sujit Patkar) त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याअगोदर सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने त्यांना अटक केली होती. दरम्यान, न्यायालयात हजर केलं असता त्यांना 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

20 जुलैला कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने सुजित पाटकर आणि डॉ किशोर बिसुरे यांना अटक केली होती. किशोर बिसुरे हे बीएमसीचे डॉक्टर आहेत, तसंच दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचे डीन होते. दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचा करार सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटशी करण्यात आला होता अशी माहिती आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून सुजीत पाटकर यांना ओळखलं जातं.

कोण आहेत सुजित पाटकर ?
सुजीत पाटकर हे ठाकरें गटाचे खासदार संजय राऊत निकटवर्तीय आहेत. पाटकर हे पेशाने व्यावसायिक आहेत. लाइफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये पाटकर एक भागीदार होते. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता.

Share This News
error: Content is protected !!