Breaking News
MLC ELECTION:

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

368 0

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होईल.आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासंदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच सामान्य माणसांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

आज महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले आहेत. या पाचही राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. पाचपैकी चार राज्यात भाजपाने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे पुढील काळात राज्यातल्या अनेक शहरातील महापालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.तसेच सामान्य माणसांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासंदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.गेल्या दोन वर्षांमध्ये करोनामुळे राज्य सरकारच्या तिजोरीतील महसूलाची आवक घटली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे आता जुने आणि नवे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार कशाप्रकारे आर्थिक सांगड घालतात हे पाहावे लागेल. आज दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!