Crime Viral Video

Crime Viral Video : लेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर गुंडांनी झाडल्या गोळ्या

900 0

आपल्या चिमुरड्या लेकीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला गुंडांनी भर रस्त्यात गोळ्या घातल्या (Crime Viral Video) आहेत. यामध्ये ती व्यक्ती जखमी झाली आहे. या घटनेचे (Crime Viral Video) CCTV फुटेज समोर आले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळी उशीरा ही घटना घडली.

काय घडले नेमके?
अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशमधल्या शाहजहांपूरमध्ये घडली होती. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन फरार झाले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाहजहांपूरमधल्या बाबूजी परिसरात मोहम्मद शोएब हा तरुण आपली लहान लेकीला खांद्यावर घेऊन बाजारात जात होता. याचवेळी दोन तरुण दुचाकीवरुन त्याच्या पुढे काही अंतरावर थांबले. तर समोर येणाऱ्या एका तरुणाने मोहम्मद शोएबवर अगदी जवळून गोळी झाडली आणि ते सगळे बाईकवरून फरार झाले.

गोळी लागल्यानंतर मोहम्मद शोएब हा लेकीसह जागेवरच कोसळला.त्यानंतर मागून एक महिला किंचाळत शोएबच्या दिशेने धावत येताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!