बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही नेहमी तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. कधी तिच्या काही पोस्ट तर कधी तिचे चित्रपट… कंगणा ही नेहमी तिचं परखड मत मांडताना दिसते. आज चक्क कंगनानं (Kangana Ranaut) कोणाला ट्रोल केलं नसून थेट एका अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. या अभिनेत्याचे नाव आहे जॉन अब्राहम. कंगना रणौतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
काय लिहिले पोस्टमध्ये?
या पोस्टमध्ये कंगनानं जॉन अब्राहमचं तोंड भरून कौतुक केलं आहे. यावेळी कंगनानं जॉन अब्राहमचा एक फोटो शेअर केला आहे. यावेळी कंगना म्हणाली, ‘आजवर चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांविषयी मी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण ज्या गोष्टी प्रेरणादायी आणि सज्जन आहेत त्यांना विसरून चालणार नाही. मी जॉन अब्रामविषयी बोलते. त्याच्यासोबत मी काम केलंय. तो किती उत्तम अभिनेता आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. जॉनविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. कारण जॉन कधीच स्वतःचं कौतुक करण्यासाठी माध्यमांना पैसे देत नाही. जॉन हा अत्यंत दयाळू आहे.’ ‘ त्याच्या खासगी आयुष्याविषयी लग्नाविषयी, रिलेशनशिपविषयी कधीच कोणती पीआर नाही, जॉन पैसे देऊन दुसऱ्यांबद्दल नकारात्मक वातावरण तयार करत नाही. तो महिलांचा फायदा उचलत नाही.तो कोणाला त्रास देत नाही. तो एक माणूस म्हणून खूप चांगला आहे… लव्ह यू जॉन…’अशा आशयाची पोस्ट कंगनाने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
कंगनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच इमर्जन्सी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना रणौत ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनासोबत या चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे या कलाकारांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. तसेच ती तिच्या ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामधील तिचा पहिला लुक समोर आला आहे.